कविता दिन
कविता दिन
1 min
414
शब्द मनातले
कागदावर लिहिले
सुंदर गोड काव्य रचले.
गीत गात जावे
आनंद गाण्यात घ्यावा
गीत ताल सुरात असावे.
कविता दिनाच्या
शुभेच्छा द्याव्या सर्वांना
कविता लिहाव्या त्या सुखाच्या.
मिलाप शब्दांचा
साथ यमकांची अशी
वर्षाव होवो काव्य रचनांचा.
सुंदर रचना
काव्यवेल बहरली
सफल कवी मन कामना.
