Maharudra Popade

Others

4.0  

Maharudra Popade

Others

कवि कालिदास कथासार

कवि कालिदास कथासार

1 min
117


 आषाढ शुद्ध प्रतिपदा, कालिदास दिन खरा 

साहित्याचा स्थायीभाव, प्रणय तो निकोप बरा !     

शारीरिक आकर्षण भाग तो जीवन प्रेरणेचा     

आसक्ती अखेर ममता वात्सल्यात परिणित ! 

दोन महाकाव्य-तीन नाटकांचा विषय हा प्रणय।

नवरत्नापैकी एक, करितो चाकरी विक्रमादित्याची    

एक-एक कृती त्याची, त्यागप्रधान प्रेमाची    

त्याग-तपष्ये शिवाय , कोणतेच साध्य नाही !   

'तप-तपोवन-त्याग' ही आदर्शत्रयी ज्याची। 

सौंदर्योपासक असतो नेहमी प्रेमाच्या तल्लीन !

नायकाची विरह व्यथा, शास्वत प्रेमाचं प्रतिक।

अजाच इंदूमतीवरील प्रेम, जसे प्रीत पतंगाचा !       

उर्वशीच्या वियोगाने, वेडा झाला पुरुरवा        

त्यांचे पुनरमिलन, हा एक मंगल उत्सव !

वडिलांचं वात्सल्य-आईची माया प्रेमाचाच एक भाग                             

यातूनही जीवनाचे साफल्य येत प्रचित्तीस। ! 

अपत्य प्रेमाचा, आईचा आनंद शब्दातीत  मुलीचा सांभाळ,

ही मातेच्या जीवनाची लागणी ! पुत्राचा पराक्रम,

हा मातेचा अभिमान।   

प्रेमापोटी, तापट कणवही बनली पिता-वत्सल !  

शकुंतलेचा सदगुरु, साक्षात निसर्गराजा।             

म्हणुनी तिच्यात दिसते निर्भयता !

पृथ्वीच्या सोशिकतेच रूप म्हणजे सीता           

प्रणय सामर्थ्यात, पार्वती ही महान !  

इंदूमतीची जीवनदृष्टीही चोखंदळ       

उर्वशीची उत्कट आसक्ती, ही अपार !


Rate this content
Log in