कुविचारांची होळी
कुविचारांची होळी
1 min
277
शिशीर संपुनी ऋतू वसंताचे आगमन
नव चैतन्य नवी पालवी संगीत पक्षी स्वरांचे
फाल्गुन पौर्णिमा येईल घेऊन सण होळीचा
रंगीबेरंगी रंग उधळूनी सादूया औचित्य सणांचे.
माणसातले प्रेम,आपुलकी एक करण्या
कुविचारांची करुया होळी
षड् रिपूचे करुनी दहन, एकोप्याचा आनंद
उपभोगुया खाऊनी होळीला पुरणाची पोळी.
