STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

4  

प्रियंका ढोमणे

Others

क्षणभरातला पाऊस

क्षणभरातला पाऊस

1 min
386

आम्हां लेकरांचे मन तृप्त करण्यासाठी

आतुरतेने तुझी वाट 

बघत असतो रे, माझा शेतकरी राजा

बघत असतो रे, माझा शेतकरी राजा।।१।।


बरसला की तू

मुलांनाही येते मज्जा

त्यांनाही तर तुझ्या मुळे

मिळते रे, शाळेला रजा।।२।।


बरसला की तू

रानमाळही फुलून दिसते रे

तहानलेल्या त्या वासरांचेही

येते रे मन दाटुन रे।।३।।


बरसला की तू

बालगोपाळही आईला

म्हणू लागतात रे

ए आई जाऊ का गं मी

या पावसात होडी सोडायला गं।।४।।


बरसला की तू

सगळीकडे सुगंध पसरवून जातो रे

माझ्या शेतकरी बापाच्या गालावर

स्मित हास्य देऊन जातो रे।।५।।


बरसला की तू

दोन जीवांच्या त्या नात्याला

प्रेमाचं उधाण देऊन जातो रे

जाता जाता त्यांना पण

तुझ्या आठवणीत रमवून जातो रे।।६।।


असा कसा रे तू

सगळ्यांना वेड लावणारा

या धरतीवरच्या प्रत्येक जीवाला

जगण्याची नवी उमेद देऊन जाणारा

नवीन उमेद देऊन जाणारा।।७।।


Rate this content
Log in