क्षणभरातला पाऊस
क्षणभरातला पाऊस
1 min
293
बरसला की तू,
मुलांनाही येते मज्जा
त्यांनाही तर तुझ्यामुळे
मिळते रे, शाळेला रजा ||2||
बरसला की तू,
रानमाळही फुलुन दिसते रे
तहानलेल्या त्या वासरांचेही
येते मन दाटुन रे ||3||
बरसला की तू,
सगळीकडे सुगंध पसरवून जातो रे
माझ्या शेतकरी बापाच्या गालावर
स्मित हास्य देऊन जातो रे ||5||
बरसला की तू,
दोन जीवांच्या त्या नात्याला
प्रेमाच उधाण देऊन जातो रे
जाता जाता त्यांना पण
तुझ्या आठवणींत रमवून जातो रे ||6||
असा कसा रे तू,
सगळ्यांना वेड लावणारा
या धरतीवरच्या प्रत्येक जीवाला
जगण्याची नवी उमीद देऊन जाणारा ||7||
