कर्माचा संदेश
कर्माचा संदेश
युद्ध भुमित उभे राहुन,
शस्त्रे हतातुन का गळली.
युद्ध क्षेत्रात युद्ध करायचे,
हि,साधी बाब हि नाही कळली.
युद्ध जन्य परिस्थिती,
आपणच तर घडवली.
युद्ध करण्यासाठी आपली बोबडी का वळली.
आता कोण कृष्ण होऊन,
येईल गीता रहस्य सांगायला.
कोण सिध्द आहे येथे,
कर्माचा संदेश द्यायला.
मीचं होऊन माझा शिल्पकार,
आपल्या विचारांना देऊन आकार.
करून लक्ष केंद्रित फक्त डोळ्यावर,
लक्ष एकरूप करू विजयावर.
मी,लढणारा, मी, जिंकणार,
मार्ग कठीण असला तरी मी,चालणार.
आता मी,नाही थांबणार,
युद्ध भुमित मी,युद्ध करणार.
मिळाला जो कर्माचा संदेश,
त्या कर्म पथावर मी, चालणार.
कर्म हिन होऊन मरण्यापेक्षा,
युद्ध करणार, मी,लढणारा.
कर्म हेच जीवन आहे,
कर्म हाच धर्म आहे.
क्रिया हिन जीवन व्यर्थ आहे,
जीवनाचा सार सर्व कर्म आहे.
कर्माचा संदेश घेऊन,
आकार देऊ जीवनाला.
कर्म योग शक्तीने करू,
समृद्ध स्वतःला, देशाला
