STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा

1 min
248

क्रांतिसूर्य ज्योतिबा

काढली मुलींसाठी

पुण्यात पहिली शाळा

स्त्रियांच्या उध्दारासाठी....!! १!!


सोबतीला सावित्री

फुले असून वेचले काटे

सोसल्या किती हाल,कष्ट

जिवनाच्या वाटे.....!! २!!


सगुणा, साऊला शिकविले

मिटवला अज्ञानाचा अंधार

तुमच्यामुळेच शिकल्या नारी

आज झाले स्वप्न साकार....!! ३!!


बहुजनांचा कैवारी ज्योतिबा

लाखात शोभला

शिवरायांची समाधी

शोधूनी काढीला.......!!४!!


शेतकऱ्यांना देण्या न्याय

लिहीले आसूड, गुलामगिरी

कर्मकांड,मुर्तीपुजा सोडून

विषमता दूर करी.......!!५!!


पडला जेंव्हा दुष्काळ

केले अन्नछत्र सुरू

समतेचे पुरस्कर्ते तुम्ही

बाबासाहेबांचे गुरु......!!६!!


ज्ञानाची ज्योत लावली

ज्ञानाची गंगा आणली

शिक्षणाची तळमळ तुमची

सावित्रीआईने जाणली....!!७!!


घरदार सोडून अर्पिले

घेतले स्वतला वाहून

वरातीतून बाजूला काढले

ब्राह्मणी लोकांनी पाहून....!!८!!


सत्यशोधक समाज स्थापिला

विधवांसाठी केले कार्य

दत्तकपुत्र यशवंत घेतला

केवढे मोठे ते औदार्य.....!!९!!


धन्य धन्य ते ज्योतिबा-साऊ

आम्ही तुमचे आदर्श घेऊ

तुम्ही लावलेला शिक्षणाचा वेलू

आम्ही गगणाला नेवू......!!१०!!


धन्य तुमचे कार्य ज्योती

तुमच्यामुळेच आज उन्नत माथा

शब्दही आज पडती अपुरे

सांगण्या क्रांतिज्योतिची गाथा....!!११!!


Rate this content
Log in