STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

कोरोना --गीत-संजय रघुनाथसोनवणे

कोरोना --गीत-संजय रघुनाथसोनवणे

1 min
574

लई झाल थैमान कोरोनाचे,

लई अती झाले ह्या विषाणूचे 

आता ह्या कोरोनाच्या आजाराला 

सर्व मिळून गाडायचे 

लढा आपण सारे देऊ 

कोरोनाग्रस्ताना जीवदान देऊ 


केला विनाश मानवाचा,

वायरस पसरला जगभर त्रासाचा 

सापडले सारे जग मरणाच्या खाईत

ह्या कोरोनाच्या भयंकर विळख्यात 


धडाधड मृत्यूचे तांडव,

सडे पडले धरतीवर 

साऱ्या जगाला सतावले 

साऱ्या मानवाला रडवले 

आता नाही ह्याला रे सोडायचे 

कायमचे पळवुन लावायचे 


लावा शिस्त स्वताःची स्वताःला 

अनमोल जीव वाचविण्याला 

सुख,शांतीने जगायचे,

सारे मतभेद विसरायचे 

मदत करा सारे जन 

होवू द्या सर्वांची एकत्र मन 


आधार द्या रे गरीबांना 

आधार द्या रे कोरोनाग्रस्ताना 

कोरोनाची दहशत संपवू 

आपणच मानव सारे,

पुन्हा विजयी होवू 

कोरोनाला आपण हरवू 

कोरोना विरुध्दचे युद्ध 

आपणच मानव जिंकू.


निघू नका घराबाहेर 

जीव धोक्यात आहे खरं  

वेळ सांगून नाही येणार 

होइल आयुष्य क्षणभंगूर 

कायदा सरकारचा पाळा बर .


साहित्याला गुण द्या
लॉग इन