कोकणची महती
कोकणची महती
1 min
250
माझ्या कोकणची महती
काय सांगू बाई किती
हिरव्या मायेची भरली ओटी
कोणाची घागर नाही रिती
माझ्या कोकणची महती
आंब्या फणसाचे झाड
घर शोभते कौलारु
अंगणात उभे ताड
माझ्या कोकणची महती
शुरवीर पुरूष जन्म घेती
साहित्यिकाने लावले वेड
मुखी त्याच्याच ओव्या येती
माझ्या कोकणची महती
नद्या वाहती झुळझुळ पाणी
दर्या सागराला येता भरती
फुलते तरी आबादानी
माझ्या कोकणची महती
सावित्री वशिष्ठी नद्या वाहती
चिपळुण ठाणे परशुराम
सारे आनंदाने हे पाहती
माझ्या कोकणची महती
शेती मिठागराचे भांडार
अमृताहून आहे श्रेष्ठ
असे जीवनाचे सार
