STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

कल्पनेच्या झुल्यावर

कल्पनेच्या झुल्यावर

1 min
42

आवडे मज झुलणे कल्पनेच्या झुल्यावरी

काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी


वाटे मौज मनी सदा जाता उंच नभाकडे

 माझ्या मनी बांधियले मनोरथ किती गडे

 पूर्ण होण्याचा आनंद येत आहे पहा तरी

काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी   १


वर झोका जाता वाटे लावूया हात ता-याला

कल्पनेचा झोका माझा दावी उंच गगनाला

येता खाली निहाळती नजर जाई शिखरी

काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी     २


कल्पनेचा झुला नेतो आठवात माहेराच्या

सय करीतो ते दिन रम्य त्या बालपणाच्या

रमते माझे मी पहा तासन् तास किती तरी

 काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी     ३


Rate this content
Log in