कळाले कधीच नाही....
कळाले कधीच नाही....
1 min
309
डोळ्यासमोर माझ्या,
मातृत्व दुर गेले,
एकटीच मी होते,
कळले काहीच नाही.....
दुधही जळाले,
कुंडात भावनेच्या,
जीव गेला चिमुकलीचा,
कळले काहीच नाही......
एकटीच बसले,
जागवीत त्या कळीला,
जागं स्वतःला मी,
केले कधीच नाही...
तळपुन सुर्य गेला,
कळली न सांज झाली,
तू गेली अशी सोडून,
कळले काहीच नाही....
वर्षात फिरुनी पाखरु,
पुन्हा घरटयात आले,
पुण्य जन्माचे कोणत्या,
कळले कधीच नाही...
