खरा किस डे
खरा किस डे
जगात आल्यावर आईने
घेतलेली पहिली किस
कायम लक्षात असू द्या
आणि आपण मात्र तेच विसरतोय...
काय तर म्हणे किस डे साजरा करतोय...
बहिणीने कडेवर अलगद
उचलून घेत असताना
घेतलेली किस म्हणजे किस डे...
पण आज आपण तेच विसरतोय....
आजीने नातवाचा घेतलेला पापा
दोन्ही मुठी आवळून
डोक्यावरून फिरवलेला हात
तिचं ते मायेनं गोंजारणं...
पण आज आपण मात्र तेच विसरतोय...
भावाने भावाच्या चुका लपविण्यासाठी
केलेली धडपड आणि
गळ्याला लावून घेतलेली गळाभेट
म्हणजेच खरा किस डे
आणि आज आपण तेच विसरतोय...
आपण करतोय फक्त
पाश्चात्त्य संस्कृतीचा... किस डे
खरी संस्कृती मात्र आपण
तेच विचारतोय
आणि काय म्हणे तर किस डे साजरा करतोय...
