Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

खेळ मांडला

खेळ मांडला

2 mins
182


लहानपण सरले

मोठेपणात आले

जीवन रंग चढले

सप्तरंगात नहाले......


जीवन सप्तरंगी

इंद्रधनू प्रमाणे

विविध रंगढंगात

सात रंगात क्रमाने....


बाल्यावस्था हर्षले

कुमारपण दंगले

तरूणपण रंगले

वृद्धत्वाकडे झुकले....


सारा खेळ मांडला

जणूकाही दैवाने

जीवनात या तर

स्विकारली आव्हाने....


त्यातूनही तरले

स्वतःला सांभाळले

प्रलोभने टाळली

सत्याशी हो झुंजले....


अती विचार केला

कामास हो झुंपले

नाव हो कमावले

लोकां खुपू लागले....


पाठिशी होते साई

 कुटुंब आणि आई

रचल्यात कविता

मनसोक्त मी बाई....


समाजात प्रसिद्धी

मिळतेय हो छान

माझे राहूल सर 

आहे गुरू महान....


वंदन करते मी

सर्व गुरुजनांना

माझ्या या समूहाला

सर्व आप्तजनांना....


Rate this content
Log in