STORYMIRROR

Mangesh Khope

Others

2  

Mangesh Khope

Others

कचराच कचरा

कचराच कचरा

1 min
295

इथेही कचरा तिथेही कचरा

सगळीकडे फक्त कचराच कचरा


कोनाड्यात कचरा खोलीत कचरा

घरात कचरा घराबाहेर कचरा

सगळीकडे फक्त कचराच कचरा


रस्त्यात कचरा रस्त्याकडेला कचरा

पुलावर कचरा पुलाखाली कचरा

सगळीकडे फक्त कचराच कचरा


गायीच्या पोटात माश्याच्या घशात

कासवाच्या पाठीत मगरीच्या आतड्यात

सगळीकडे फक्त कचराच कचरा


जमिनीवर कचरा पाण्यात कचरा

हवेत कचरा अवकाशातही कचरा

सगळीकडे फक्त कचराच कचरा


देहात कचरा मनात कचरा

चित्तात कचरा नात्यात कचरा

सगळीकडे फक्त कचराच कचरा


एवढा कचरा पाहून मन गेले वेडावून

क्षणभरातच एक विचार गेला मनात डोकावून

कचऱ्यातच आयुष्य अन आयुष्यातच कचरा

कितीही झाले तरी न होऊ द्यावा मात्र या सुंदरआयुष्याचा कचरा


इथेही कचरा तिथेही कचरा

आपले आयुष्य मात्र आनंदाचे करा !


Rate this content
Log in