कचरा ढिगारा
कचरा ढिगारा
पाठीवर शाळेच्या दप्तरा ऐवजी
कचऱ्याच्या गोण्या नशिबी आल्या
काय म्हणावे ह्या त्यांच्या नियतिला
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून त्या चालल्या.
स्वच्छता मोहीम काढली सरकारने
पण लोकांनी मनावर घेतलं नाही काही
विखुरलेला कचरा गोळा करतात बिचारी
त्यामुळे रस्त्यावर थोडी स्वच्छता दिसत राही.
प्लास्टिक बंदी आणली जन स्वास्थ्यासाठी
पण माज चढलाय ज्यांना जे रस्त्यावर फेकती
गल्ली गल्ली भटकुनी गोळा ह्या पोरी करती
फक्त एक घास मिळण्या त्यांच्या पोटा पुरती.
एक मिनिट ही दुर्गंधी घेणे अशक्य वाटे आम्हा
अशा दुर्गंधित ही प्लास्टिक कागद वेचून घेती
देवा काय अपराध ह्या चिमुकल्या गरिबांचा
गरिबा पोटी जन्म घेतला दोष कुणाला देती!
ओल्या कचऱ्याचे खत करा आपल्या घरात
रिसायकल करण्यास द्या सुका कचरा वेगळा
मग कचऱ्याचा ढिगारा असा नाहीच होणार
स्वच्छता मोहीम सफल करण्यास उपक्रम आगळा.
