काय म्हणतील जनी
काय म्हणतील जनी
1 min
10
हसून पाहिले गाली
ओठी लावली लाली
भीति ही वाटते मनी
काय म्हणतिल जनी
ओठांवर येता गाणी
बघी डोळे वटारूनी
धाक मज वाटे मनी
काय म्हणतिल जनी
वाटते फिरावे रानी
रात्री बघावी चांदनी
थरकाप उड़े मनी
काय म्हणतिल जनी
मनाविरुद्ध वागले
विसरले हे जगणे
व्यर्थ विचार हे मनी
काय म्हणतिल जनी
