मी फुल अबोलीचे
मी फुल अबोलीचे

1 min

62
चांदणी निळ्या नभाची
प्रितीत मी अंकुरली
हळव्या गर्भात तुझ्या
ममतेत मी रुजली......१
श्वास तुझा हृदयी माझ्या
तुमची मी परछाया
रूपाचा तुझा वारसा
बाबांची घेतली काया...२
मी प्रकाश आशेचा
तुझ्या अबोल स्वप्नांचा
मी निशिगंध प्रेमाचा
तुमच्या सप्त सुरांचा....३
नाव जगी करणार
ओळख तुज देणार
आई ताई सून कन्या
नात्याला ग जगणार ...४
*मी फुल अबोलीचे*..!