अस्तित्व
अस्तित्व

1 min

93
तीच आहे मी
का हरवलीय कुठे
भूतकाळाच्या पानात
काळवटलीय कुठे
माझ्यातच मला
मी शोधते पुन्हा
बदलते अर्थ सारे
'का' चे उत्तर शोधते पुन्हा
दोष देते स्वतःला
काय चूक माझी
मी ही आहे माणूस
हाडामासाची
राग लोभ प्रेम
मला ही आहेत भावना
गुणांचा बनवून पुतळा
जाळू नका माझ्या मना
संयमाची माझ्या
किती घेणार परीक्षा
अंत नको त्याचा
मी मागते दिक्षा
दुसऱ्याच्या पंखाखाली
किती वेळ राहणार तू
सावलीखाली त्याच्या
किती सोसणार तू
कवडसे उन्हाचे होतील तिरके
मध्यान्हाला भेटतील उने
उनसावलीच्या खेळामध्ये
किती सोशाशील एकटे