STORYMIRROR

Pritee Patil

Inspirational

3  

Pritee Patil

Inspirational

अंतरीचा देव भेटे

अंतरीचा देव भेटे

1 min
46

देव भेटी अंतरात

वेडा शोधी दगडात!!१!!


बघ प्राणी माणसात

देव दिसेन तयात!!२!!


देव प्रेमाचा भुकेला

तू दूध पाजूनी आला!!३!!


झोळी फाटकी उश्याशी

माय निजली उपाशी!!४!!


कर हिशोब कर्माचे

भोग हे पाप पुण्याचे!!५!!


जनसेवा ईशसेवा

मनी वसो भक्ती ठेवा!!६!!


हृदयात मायबाप 

वात्सल्य करुणा जप...!!७!!


आवडतो तोचि त्याला

देव अंतरात ज्याच्या...!!८!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational