काहीतरी हरवलंय...
काहीतरी हरवलंय...
सर्व ग्रह नवलाने विचार करतात,
मानव पृथ्वीवरच का बरे राहतात?
पृथ्वीच्या डोळ्यांमध्ये मी अश्रू पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय..
दररोज वेळेपुर्वी सुर्याचा उदय होतो,
भेदभाव न करता सर्वांना सुर्यप्रकाश देतो,
डोंगरदऱ्यांमागे सुर्याला लपताना मी पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
ऊन्हाळ्यापासूनची तहान तो मिटवतो,
तापलेल्या भुमीवरती हिरवळ तो पसरवतो,
बरसत्या नभाला रडताना मी पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
रडणाऱ्या प्रत्येक बाळाचा चंदामामा होतो,
प्रियकर-प्रेयसीच्या आठवणी ताज्या करतो,
अमावस्येस चंद्राला लपताना मी पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
रात्रीच्या अंधारात तिचेच राज्य चालते,
नभा-नभांमध्ये जोरदार भांडणे लावून देते,
त्याच विजेला गरजताना मी पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
पहाटेच्या सुर्यप्रकाशात हिऱ्यासारखे चकाकतात,
फुलपाखरांना खेळण्यासाठी बोलवतात,
तळावरील दवबिंदूना दुःखी मी पाहिलंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
विज्ञानाला अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेलं मी पाहिलंय,
साहित्याच्या विश्वाला बंदिस्त खोलीत मी पाहिलंय,
संपूर्ण जगच मानवामुळे बदललंय,
आणि खरंच काहीतरी हरवलंय...
