जोगवा मागते
जोगवा मागते
जोगवा मागते गं आई जोगवा मागते
जोगवा मागते गं अंबे जोगवा मागते ।। धृ ।।
आईबाबांच्या मायेचा ,मुलांच्या सुखाचा
निसर्ग सौदर्याचा, माणसांच्या माणुसकीचा ।
आई कोरोनाची रोगराई दूर करण्या सांगते
जोगवा मागते गं अंबे जोगवा मागते ।। १ ।।
साडेतीन शक्तिपीठातली तू महालक्ष्मी आई
महा शक्तिशाली, मायेची साऊली तू बाई ।
तुझ्या कृपेची भीक मागते, दर्शनास मी धावते
जोगवा मागते गं अंबे जोगवा मागते ।। २ ।।
माहूरगडची राणी ,भक्तासाठी पाठीराखी
देवीमाता ती रेणुका ,धावे सदा भक्ता हाकी.
आदिशक्ती आदिमाया, वरदहस्त तुझा मागते
जोगवा मागते गं अंबे जोगवा मागते ।। ३ ।।