जलपरी अवतरली
जलपरी अवतरली
1 min
255
जलाशयातून जलपरी अवतरली
पाहता क्षणीच मनात भरली
लावण्य सुंदरी मोहक कांती
जणू स्वर्ग अप्सरा मज दिसली.
हिरवाईचे प्रतिबिंब जलात चोफेर
त्यात उठून दिसे युवती भारी सुंदर
सोनेरी किनार शुभ्र वस्त्र धारिणी
सोन्याचा भाल तिलक भालावर.
शुभ्र मोगऱ्याचे गजरे काळ्या कुंतलात
काळ्या मण्यांची सुवर्ण जडीत गळी हार
हाती कंगन अन् कानी सोन्याचे झुंबर
प्रेमळ नजर, मुखी स्मित हास्य ते स्वार.
भासे मदन मंजिरी ही जलपरी जणू
प्रगटली जलाशयातून ओला चिंब पदर
डाव्या हाती धरुनी ती चाले लटकदार
पहा विलक्षण तेजस्वी तिची नजर.
