जिवन संघर्ष
जिवन संघर्ष
1 min
11.9K
पदोपदी ह्या जगतात
जिवन युद्ध हे सुरू.
कर्म सिध्दातानुसार
संघर्ष जिवनाचा करू.
जन्म घेने अन मरने
हाच जिवनाचा प्रवास.
मधल्या काळात घडतो
किती जनानांचा सहवास.
जन्मा पासुन मरना पर्यंत
किती दिव्ये हि केली.
नव,लौकीक, सत्ता, पैसा
मिळवायला आहुती हि दिली.
केली शर्त जगण्यासाठी
किती दु:खे उपसले.
मृत्यलोकात ह्या जगण्यासाठी
किती जिवन संघर्ष केले.
जिवन आणि संघर्ष हे
तर बाजु नाण्याच्या दोन.
ह्या जात्याच्या मधले दाने
आपण येथे वाचणार कोण
