जीवन सार्थ
जीवन सार्थ
1 min
231
आयुष्यात
कर्म करू
जीवनाचे
मोल धरू.......१
जन्म मृत्यू
जीवनाचा
मध्ये काळ
जगण्याचा.......२
आयुष्याचे
असतात
तीन पर्व
जगण्यात........३
बालपण
खूप छान
मजा मस्ती
ती महान........४
तरुणाई
प्रेम लग्न
पैशासाठी
असे मग्न.........५
वृध्दावस्था
आरामाची
समाधानी
राहण्याची.........६
आयुष्याचे
जाणू मर्म
सत्कर्म ते
करू कर्म........७
लोकहिता
कार्य करू
पुण्य कर्म
ते पत्करू......८
आयुष्यात
किर्तीवंत
कार्य करू
शोभिवंत.......९
सोने करू
आयुष्याचे
सार्थ होई
जीवनाचे.........१०
