STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

जीवन कसे जगावे

जीवन कसे जगावे

1 min
84

मानव जन्म हा लाभला करु सोने सर्वस्वाने

दिधले आयु ते देवाने जगु जीवन आनंदाने ... धृ

निशेत दडली पहाट नसे तम सदाकाळ

का बाळगी भिती मनी नको खंत कदाकाळ

आशेची सकाळ येता ,हो सज्ज स्वागता हर्षाने   1


गाणे देई मना आनंद भरु सप्त स्वर मनात

होता संगीतमय जीव, व्यथा जाती दूर क्षणात

मनी राखता हे भाव, भरे जीवन सौख्याने    2


नदी धावे जीवन देण्या, मग का रडत बसणे

करिते का खंत सरिता, काट्यात फुलाचे हसणे.

राहू सदा समाधानी, सुख येईल नित्याने     3


Rate this content
Log in