जीवन जगताना
जीवन जगताना
1 min
771
जीवन जगताना
आयुष्याची होरपळ होते
आयुष्याचे चटके सोसतांना
जगण्याची जाणीव होते
रात्रीचा दिवस होतो
दिवसाची रात्र होते
आयुष्याच्या पाटीवर
काळाची लेखणी होते
वर्तमानात जगताना
भूतकाळाची आठवण होते
भविष्याचा वेध घेता
उमेदही जागते
आयुष्य जगताना
क्षणाची क्षति होते
काळाच्या ओघात
आयुष्यही सरते
जीवन जगताना
आयुष्याची होरपळ होते
