जीवन एक रंगभूमी
जीवन एक रंगभूमी
आयुष्याच्या जीवनपटावर तीन अंकी नाटक
जन्म ते मृत्यू ,बाल्य,युवा अन् म्हातारपण
मनुष्य पात्री रंगवी नाटक,तीन अंकी जीवन
चढ उताराचे नाटकरुपी जीवन असे जगणं.
पहिला अंक असे स्वछंदी मस्त निरागस
युवा मध्ये डाव पेच करुनी जमवी उत्पन्न
असे म्हातारपण सुखाचे अथवा क्लेशाचे
जीवन रंगभुमी नसे सर्वांची ती सुखी संपन्न.
प्रत्येक प्रात्राने पार पाडावी आपली भुमिका
नाटकाला रंगत आणावी त्या स्वकर्तुत्वाने
जन्म ते मृत्यू जीवन नाटक छान रंगवा
प्रत्येकाने रंगभुमीचे नाटक रंगावे स्वाभिमानाने.
जीवनात सत्कर्माने सतत पुण्य कमवावे
जीवनभर परोपकार सद्बुध्दीने वागावे
नाव लौकिक मिळवावे तुमच्या सद्गुणाने
जीवनातल्या रंगमंचावर यश संपन्न करावे.
