झाशीची राणी
झाशीची राणी
1 min
784
वीरांगना शूर लक्ष्मी बाई
स्वातंत्र्यात अमर झाली
राणी लक्ष्मीबाईंची गाथा
दिव्य ज्योत पेटवून गेली १
तांबे कुळीची मनु आली
शूर नेवाळकरांच्या महाली
अन एका दैदिप्यमान पर्वाला
झाशी मध्ये सुरुवात झाली २
जनसेवेसाठी राणी जगली
जनतेच्या दु:खात दु:खी झाली
रयतेच्या हितासाठी राणी लक्ष्मी
स्वत: अस्तित्व विसरुन गेली ३
राणी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी
इंग्रजांशी प्राणपणाने लढली
शेवटच्या क्षणा क्षणापर्यंत तिने
तिने प्राणांची आहुती दिली ४
मेरी झाशी नही दूंगी ललकारी
देत ब्रिटिशांविरूद्ध लढली
विद्दयुलतेसम तलवार फिरवित
राणी लक्ष्मी बाई अमर झाली ५
