STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

इंदिरा गांधी-

इंदिरा गांधी-

1 min
758

आपल्या इंदिराजी गांधी 

खरोखर गरीबांच्या आई 

दीन दुबळ्यांच्या माई 

नेहरु कुटुंबात जन्म घेवून 

कमला नेहरु आई थोर 

केले कन्येवर आदर्श संस्कार 

तेजस्वी बुद्धी महान 

पंडीत नेहरूंच्या वंशात 

आल्या कन्येचा जन्मात 

लहान वयात महान 

नेहरु घराण्याच्या दिवा होऊन 

त्यांचे कार्य बापासमान 

कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून 

ओढ लागली राजकारणातून 

उच्च शिक्षण पूर्ण करून 

वेध लागले राजकारणातून 

लोकशाहीत निवढणूक लढवून 

 भरघोष मतांनी विजयी होऊन 

जनतेने कौल त्याना देऊन 

केंद्रीय मंत्री मंडळाचे बहुमत सिद्ध करून 

भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान 

महिला हक्काचा जगास अभिमान 

स्वता:ला देशकार्यात दिले झोकून 

गरीबांविषयी हृदय कळवळून 

ध्यास घेतला अंत काळजातून 

भले करण्याचा ध्यास मनी घेवून 

गरीबी हटाव नारा पुकारून 

गोरगरीबांस सुविधा देऊन 

दीन दलितांचा उद्धार करून 

उच्च शिक्षणाची संधी देवून

उच्च पदाच्या नोकर्या देऊन 

सर्व जाती धर्मास न्याय देऊन 

सरकारी मोफत शिक्षण 

बालहक्कास सोय शिक्षणातून 

निरक्षराना साक्षर करून 

राष्ट्रीय उद्दीष्टये गाठली त्यातून 

देश विकासाच्या पातळीवर नेऊन

गोरगरीबांचे केले कल्याण 

मोफत घरकुल योजना आणून 

गरीबांस घरे दिली बांधून 

लोकांचे आरोग्य सुधारून

मोफत शस्रक्रिया करून 

लोकसंख्येला आळा बसवून 

देशाचे आदर्श उद्दीष्ट गाठून 

यशस्वी झाल्या महिला पंतप्रधान 

केला त्यानी आदर्श निर्माण

बेरोजगारांना देऊन रोजगार

बेकार केले त्यानी चाकर 

केले गरीबीचे सतत निर्मूलन 

भारताच्या इतिहासात क्रांती करून 

नाव कोरले सोनेरी अक्षरानं 

राहील कायम त्यांच्या कार्याचे स्मरण


Rate this content
Log in