STORYMIRROR

Amrapali Ghadge

Others

3  

Amrapali Ghadge

Others

हृदय

हृदय

1 min
398

दिनरात्र परिश्रम 

मूठभर हृदयाची 

कार्यरत हृदय हमी 

जिवंत असण्याची 


मानवी वक्षीय गुहेत 

सुरक्षित स्थानी बसते 

दोन फुफ्फुसामध्ये 

हृदय स्थित असतें 


पेरिहृदयपटलाचे संरक्षण 

पोकळ,शंकू आकाराला 

मानवी हृदय नाजूक असे 

असतें हलके वजनाला 


चार कप्पे दोन वर खाली 

कर्णिका जवनिका म्हणती 

उत्साहाने कार्य आपआपली 

दोघी सुसंघटित त्या करती 


जमा होते अशुद्ध रक्त सारे 

हृदयाच्या बाजूस उजव्या 

फुफ्फुस रक्त शुद्ध करून 

पाठवते बाजूस मग डाव्या


ऑक्सिजन युक्त रक्त 

पेशीद्वारे शरीरात वाहते  

हृदयाच्या या कर्तृत्वाने 

सजीव जीवनगाणी गाते 


हृदयाचे प्रसरण अंकुचन 

अगदी होते बघा तालात 

तोच असतो ठोका हृदयाचा

जे मिनिटाला 72 पडतात... 


Rate this content
Log in