हृदय मंदिरी
हृदय मंदिरी
1 min
136
हृदय मंदिरात ठेवावी सदैव माया
घडोघडी झिजवावी लोकांकरता काया.
प्रेम देत जावे दीन दलीत समाजाला
सत्कर्माने शुशोभित करावे जिवनाला.
निःस्वार्थी वृत्ती अंगी बाळगावी यदा कदा
अडचणीत लोकांना मदत करा सदा.
लोण्याहुन मऊ असावे हृदय सर्वदा
आभाळासारखी खोलीची असावी मर्यादा.
पावित्र्य मागंल्य जपावे सदा जीवनाचे
शुभ कतृत्वाने सार्थक व्हावे आयुष्याचे.
