हळवं मन
हळवं मन
मनात विचारांच उठलेलं
वादळ, कस कोणाला कळावं.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जातं हे मन हळवं.
बांध किती घालावेत, किती याचना कराव्यात.
काहीच सुचेना याला कसे मनवावं.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळव.
मन चाके होऊन धाव घेत, बंध तोडुन सर्व
लगाम कशी घालावी,
कळतच नाही आता काय करावं.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळव.
हारणे, जिकंणे हा तर मनाचाच खेळ सारा.
हे सारे बुध्दीला मग का नाही कळावं
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळव.
मन हळव, रंगवत चित्र संप्नांची कल्पनेच्या रंगांनी.
घडवत क्षितिज, जस आकाशान धरनीला मिळाव.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळव.
मन हळव, जनु नाजुक वेलीवरच पानच.
शब्दाच्या वादळात लांब कोठे तरी वाहतच जाव.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळव.
मन हळवं, सबल करावं, निश्चयाने बुध्दीच्या.
मन हळवं स्थिर करावं, धेयाने मन शांत करावं.
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळवं.