STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

हिरवी धरती

हिरवी धरती

1 min
229

हिरव्या धरणीचे हे 

मज स्वप्न आले रात्री

होईल वर्षाव सरींचा

पीक येईल याची खात्री 


हिरवेगार फुलले रान 

पाहता मन माझे भुलले 

थंडगार वार्‍याच्या झोताने

बघा कसे रान मोकळे झुलले 


मंजुळ गाणे गाती पहा 

ही किलबिल पाखरे 

स्वर घुमती रानावनात 

बघा शेत डोलती खरे 


विसरावे सारे दुःख मनाचे 

नव्याने आशा उद्याची घेऊन

घेऊनी न्यारे वरदान धरतीचे 

जगावे नवी प्रेरणा देऊन 


हिरवी धरती सारी बहरली 

पावसाच्या खास बहाण्याने 

नभातून येई भेटी धरणीला 

प्रेयसीला भेटण्या प्रकर्षाने 


साहित्याला गुण द्या
लॉग इन