STORYMIRROR

Hari Suryawanshi

Others Children

3  

Hari Suryawanshi

Others Children

हे श्रावणसरींनो

हे श्रावणसरींनो

1 min
106

हे श्रावणसरींनो

कधी बरसाल

या खडकाळ

माळरानावर? 


तृप्त धरेंवरी

सदैव बरसता

कधी बरसाल

शुष्क प्रांगणावर? 


कोसळती श्रावणधारा

त्या गगणातून

अलगद कुरवाळण्या,

प्रस्थापितांची कुरणे! 


करपली धरणी 

मरती पिके

आसमंती नजर

ये सखे! 


उर फाटतो

धीर सुटतो

मरणाची आम्ही

वाट पाहतो! 


किणकिणणाऱ्या कंगणांना

साथ श्रावणाची

हिरव्या मखमलींना

सोबत जन्मांची!


रंग-बेरंगी श्रावण

भेद करतो

पिळलेल्या शोषितांचा

वेध करतो


स्वातंत्र्यापरी झुठा

हा श्रावण!

लक्ष्मीधीशांनी

बांधली दावणं! 


फाटलेल्यांना मरण

देई श्रावण! 

ऐश्वर्यपतींचे

भरतो धरण


श्रावणाचे गीत

कुणासाठी? 

भळभळलेल्या जखमा

कुणासाठी? 


मायेची कूसं

सारखी

आम्हांस का

झाली परकी? 


समतेचा श्रावण

कधी बरसेल? 

स्वातंत्र्याचा गंध

कधी पसरेल? 


छळण्या आम्हां

तत्पर श्रावण

अंतर आम्हां

तया लोटांगण!


गुलाम श्रावणा

हो सावधान

शस्त्र खेचले

करु आबादाणं! 


फास आवळोनी

ताकदीने खेचू

आणू माळरानी

ओलावा वेचू


हे श्रावणसरींनो

आता नरमाईने

निर्ढावलेले वीर

जमलेत अपूर्वाईने! 


बरसावंच लागेल

शुष्क माळरानावर

न दिसेल

श्रावण गगनावर


Rate this content
Log in