मैत्री....!
मैत्री....!
1 min
348
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात.....
प्रत्येक वळणावर अनोळखी नाती जूळतात.....
अनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात.....
आयुष्यात येऊन आयुष्यच बनून जातात.....
ही नाती हसतात, खेळतात, भांडतात, रूसूनही बसतात.....
पण तरीही एकत्र येतात जश्या संगमावर नद्या मिळतात.....
कितीही दूर असली तरी मनात आठवण बनून राहतात.....
अश्या या प्रेमळ नात्यांनाच 'मैत्री' असे म्हणतात........
