मैत्री करत असाल ......!
मैत्री करत असाल ......!
1 min
146
मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ
करा..
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणोंक्षणी आठवेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
चंद्र-ताऱ्यासारखी अतूट
करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा..
अंधारात ही प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर
करा..
मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर
करा..
शेवटपर्यंत निभावण्याकरता
मरण सुद्धा जवळ करा..!!
