मैत्री
मैत्री
1 min
245
मैत्री कधीही होते
मैत्री कुठेही होते
नाते मनाशी मनाचे
नकळत पणे जुळते
दोन शब्द बोलता बोलता
मोठे वाक्य होते
हाय बाय करता करता
हृदया पर्यंत जाते
सुरुवात थट्टा मस्करीत
गप्पा गोष्टींत रंगते
इतकी ओढ़ लागते की
सुख दुखही संपते
मैत्री पहावी करून
मैत्री जपावी हरवून
सर्व नात्यांमधे घट्ट
फ़क्त मैत्रीच असते...
फ़क्त मैत्रीच असते...
