STORYMIRROR

Hari Suryawanshi

Others Children

3  

Hari Suryawanshi

Others Children

वाटा

वाटा

1 min
182

 सोप्या नसतात कधीच 

वाटा आयुष्याच्या

 त्या ओळखण्यातच घालवतो 

माणूस काळ जीवनाचा त्याच्या


कधी दूर जाणारी एखादी वाट

अलगद घालते भुरळ

चालू लागता मग कळते 

अरे हे तर केवळ मृगजळ


जवळ असणारी वाट

वाटे कधी सुंदर

थोडे अंतर चालल्यावर

दिसती समोर काटयांचे डोंगर


कधी एखाद्या अरुंद पायवाटेचा

होतो मोह मनाला

चालू लागता त्यावरी मग कळते

यावरून चालताना त्रास होते तनाला


कधी एखादी वाट घेऊन जाते  

स्वप्नामधील गावा

जाग येताच कळते

हा तर मनाचाच गनिमी कावा


वाटा अशाच असतात

सगळ्या वेगवेगळ्या

कधी समांतर कधी विरोधी

असतात आगळ्या वेगळ्या


आपण फक्त चालतच 

राहायचं असतं

येता आपलं ठिकाण

थांबायचं असतं...


Rate this content
Log in