STORYMIRROR

काव्य चकोर

Others

2  

काव्य चकोर

Others

हा कृष्ण कोणाचा

हा कृष्ण कोणाचा

1 min
329

देवकीच्या नाळेचा

जन्म बंदिशाळेचा

कान्हा नंद यशोदेचा

वृंदावन की गोकुळचा..?

हा कृष्ण नक्की कोणाचा..??


बंधू प्रिय सुभद्रेचा

पाठीराखा द्रौपदीचा

मित्र सखा पार्थाचा

इंद्रप्रस्थ की द्वारकेचा..?

हा कृष्ण नक्की कोणाचा..??


शिष्य गुरु संदीपानीचा

गुरुबंधू मित्र सुदाम्याचा

सवंगडी तोच गोपाळांचा

यमुनेचा की कालिंदीचा..?

हा कृष्ण नक्की कोणाचा..??


मनमोहन तो राधेचा

मुरलीधर तोच मीरेचा

रुक्मिणीच्या हृदयाचा

हट्ट तोच सत्यभामेचा

हिचाचं की तो तिचा..?

हा कृष्ण नक्की कोणाचा..??


संग हा समजण्याचा

रंग जसा पाण्याचा

गुणधर्म मिसळण्याचा

ज्याने मानला तो त्याचा

हा कृष्ण सकल भक्तांचा..!!


भाव तो सख्यत्वाचा

ठाव तोच भक्तित्वाचा

द्वैतातही अद्वैताचा

हा कृष्ण सकल वंचितांचा..!


Rate this content
Log in