STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

गुरुवंदना

गुरुवंदना

1 min
567

श्री स्वामी समर्था गुरुवर्या ।

मी वंदितो तव पद कमला।।

तूच एक सर्व श्रेष्ठ मज माऊली।

सदैव असावी तुझी कृपेची साऊली।।


तुझे दर्शन घेता भासे मम दत्त दिगंबर।

नयनात दिसे मज शिर्डीचे श्री साई नाथ।।

तू तर आहे माऊली माझी श्री गजानन।

कटेवरती हात ठेऊनी ऊभा तू पांडूरंग।।


दर्शन घेता देव देवतांचे आठवे मज जननी।

त्या थोर मातेमुळेच आज दर्शन घडले या देवांचे।।

मातृदेवो,पितृदेवो,आणि गुरुदेवो भवःनमन।

सर्व गुरुजन हो कृपादृष्टी असू दे सदैव।।


आज गुरुपौर्णिमा वंदितो सकल गुरुजना।

वरद हस्त असू दे सदा या शिष्यावरी।।

शिकवण दिली, जे ज्ञान मी संपादिले।

उपयुक्त करू दे मला सकल लोक जना।।


Rate this content
Log in