गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
1 min
495
रिपरिप पावसाची
बंद आता झाली बाई
वेध गुलाबी थंडीचे
झाली शरदाची घाई.
येई पहाट धुक्याची
दवबिंदू तृणापाती
गार वाऱ्या संगे झुले
श्वेत मोती भासताती.
वेध गुलाबी थंडीचे
शाल छान लपेटुनी
मनसोक्त फिरण्याचे
हात प्रियाचा घेऊनी.
सळसळ वारा वाहे
रोम रोमात शहारे
शेकोटिच्या भोवताली
सख्या तुझ्याच सहारे.
तुझ्या माझ्या नयनात
थंडी गुलाबी पहावी
तुझ्या मिठीत साजणा
रात्र सारी ती जागावी.
उबदार शाल अंगी
रोम रोम तो गारवा
मज प्रफुल्लता देई
मनी सुगंधी मारवा.
वेध गुलाबी थंडीचे
मस्त धुके झेलायचे
छान कडक चहा तो
आम्ही एकत्र प्यायचे
