गुलाब
गुलाब
1 min
11.4K
गुलाब प्रतीक जीवनाचे,
सुख दुःखाचे हे, प्रतिरूप.
गुलाबी सुगंध सुखाचा तर,
काटे दु:खाचे रूप.
गुलाबाच्या रूपात भुलण्याआधी,
काट्यांचे हि भान ठेवाव.
सगळच छान छान व्हाव,
मनासारख अस कधी घडाव.
गुलाब पाकळ्या जर असु आपण,
तर काटे रक्षण कर्ते पालक.
एकमेकांचे दोघेही सोबती,
रंग, गंध जरी वेगळे आहेत ते जीवनाचे चालक.
गुलाब रूप हे चैतन्याचे,
काटे वैराग्याचे प्रारूप.
एकमेकांशी सांगड घालून,
बदलतात हे जीवनाचे रूप.
