STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

"गुलाब"

"गुलाब"

1 min
395

"गुलाब"

मोहक फूल,

मऊ मुलायम पाकळ्यांचं;

मंद धुंद सुगंध असलेलं!


"गुलाब"

मन मोहवणारं,

एक सुगंधी अत्तर;

क्षणांत मन प्रफुल्लीत करणारं!


"गुलाब"

नाजूक नार,

अप्सरेची काया लाभलेली;

भल्या भल्यानाही भुरळ पाडणार!


"गुलाब"

चक्रीवादळ खवळलेलं,

होत्याचं नव्हतं करणारं;

बंगाल सागरात तीव्रतेने उसळलेलं;


"गुलाब"

विविध प्रकारे,

मोहक आणि विध्वंसक;

हवेहवेसे किंवा नकोसे वाटणारे!


Rate this content
Log in