STORYMIRROR

Sanjay Pande

Others

3  

Sanjay Pande

Others

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
475


कसा करावा साजरा

चैतन्याचा गुढीपाडवा

संपत आलाय आपसात

असलेला मायेचा गोडवा।।


आनंदाची गुढी उभारणे

कधीचेच झाले आहे बंद

लोकांना दाखवण्यापुरते

जोपासतोय आपण छंद।।


जशीजशी माणूसकीची

उंची होत आहे कमी

माणूसकीने वागण्याची

कोणी घेत नाही हमी।।


नुसती गुढी उभारूण

येणार का अंगी चैतन्य

दुःखीतांना आनंदी करण्याचे

कोणी दाखवणार का सौजन्य।।


या सारे मिळून आपण

चैतन्याची गुढी उभारू

जो जसा आहे तसा

त्याला आनंदाने स्वीकारू।।


Rate this content
Log in