STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

गुढी पाडवा

गुढी पाडवा

1 min
459

नवीन वर्षाची सुरूवात

चैत्रातील गुढी पाडव्याने

संस्कृती परंपरा जपणे

पाडव्याची गुढी उभारण्याने


जरतारी रेशमी वस्त्रावर तांब्या उलटा

माळ घालुनी सजवू फूल बत्ताशांची

नव्या आशेची, प्रेमाची गुढी उभारू

विनवू तिज, नष्ट कर अवदसा कोरोनाची


रितीनुसार सेवन कडूलिंब पाला रस

मग नैवेद्य जेवण गोडा धोडाचे झक्कास

संचार बंदीमुळे सारे कुटुंब एकत्र घरात

आपत्तीकाळ तरी सणवारांच्या तत्त्वास


आठवणीत राहिल आजचा पाडवा

नाही नवी खरेदी नाही आनंद जनात

पूर्वी नाही कधी घेतला असा अनुभव

भितीचे एक सावट प्रत्येकाच्या मनात


उभारू गुढी नव्या आशा संकल्पांची

मागू देवाकडे इडा पिडा जावो टळून

नवे वर्ष येवो घेऊन सुख समाधानाचे,

कोरोनाचा रोग जावो जगातून पळून


Rate this content
Log in