ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
विशाल देश माझा भारत महान
अठ्ठावीस राज्ये,नऊ प्रदेश केंद्रशासित
तिरंगा ध्वज असे त्याची शान
हिरवा रंग दाखवी शेती ग्रामात.
पहा ग्रामीण भागात भारत वसलाय
होतकरू,कष्टकरी शेतकरी शेतात
दिन रात्र धान्य पिकवतो राबून
सारे भारतीय आहेत त्याच्या उपकारात.
प्रगती गावाची तरच ती देशाची
गांधीजी सांगायचे चला खेड्यापाड्यात
गावे सुधारतील तेव्हाच होईल प्रगती देशाची
मग पहा सुजलम् सुफलम् देश ग्रामात.
साधी भोळी जनता ग्रामवासी
अन्न,वस्र,निवारा साधी राहणी
अल्पसंतुष्टी वृत्ती साऱ्या गावकऱ्यांची
एकमेकां सहाय्य करू अशी असे करणी.
आज बदलतोय ग्रामीण भारत
आर्कषतो त्यास भपकारा शहराचा
शिक्षण उद्योगास धावती ते शहराकडे
थोडेच येती पुन्हा उत्कर्ष करण्या गावाचा.
