Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

गोड गोजीरा श्रावण

गोड गोजीरा श्रावण

1 min
220


गोड गोजीरा श्रावण आला

आला वसुंधरेचा सण

श्रावणाच्या सुंदरतेने

शहारून गेले मन


 सर सर बरसल्या

 पाऊस धारा

गंधाळली माती

आनंदाने घरगंळत आले

दवांचे मोती


सैरभैर झाली पाखरे

मैना गाते मंजूळ गाणी

दऱ्याखोऱ्यातून वाहते

खळखळाट पाणी


पाणाफुलांच्या गळाभेटीने

गंध फुलांचा दरवळतो

निळ्या निळ्या आभाळातून

इंद्रधनू डोकावून पहातो


उभा डोंगर पांघरून घेतो

शालू हिरवा हिरवा

सळसळ येऊन मिठीत घेतो

गार गुलाबी गारवा


गर्दगडद धुक्यातही

झाडेझुडपे लाडवतात

खेळ खेळून लता लतिका

एकमेकास छेडतात


हिरव्या हिरव्या गालीच्यावर

श्रावण हळूच अवतरतो

फुलवून पिसारा मोर बघा

थुई थुई नाचतो


रुबाब देखणा श्रावणाचा

डोळे भरून पहावा

रंगीबेरंगी आसमंत सारा

कवेत धरून घ्यावा


Rate this content
Log in