STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others Children

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Others Children

गणरायाची गजस्वारी

गणरायाची गजस्वारी

1 min
203

बसुनी थाटात गजावर

फिराया चालले गणराज |

घालुनी अंगी पीतांबर

मस्तकी मोरपंखी ताज ||१||


धरु पाहे चंदामामा

हाती घेऊन मोदक |

शोधती दाट जंगलात 

पिण्यासाठी उदक ||२||


हाती शोभती कंकण 

गळ्यात कंठीमाळ |

भ्रमण वनात करतो

देवी पार्वतीचा बाळ ||३||


शोभे ललाटी गजाच्या 

लाल पांढरा टिळा |

डौलात चालली स्वारी 

वर आकाश निळा ||४||


दिसती गुबगुबीत गजाचे

मोठे सुपासारखे कान |

पांढरे शुभ्र लांब दात 

आहेत दिसायला छान ||५||


पार्वतीनंदन श्री गणराया

करतो तुझी मी भक्ती |

विवेकाने जगण्याची 

दे रे मला तू शक्ती ||६||


Rate this content
Log in