गणेश स्तवन
गणेश स्तवन


शुभ कार्यारंभी । गणेश पूजतो ।
सुख ते मागतो । भक्तगण..।। १ ।।
गणेश चतुर्थी । होई आगमन ।
देव गजानन । गणपती.. ।।२ ।।
सजवले छान । सुबक आसन ।
गणेश स्थापन । मखरात..।। ३ ।।
सकल मिळुनी । करती पुजन ।
गणेश स्तवन । आरतीने...।। ४ ।।
प्रसाद मोदक । प्रिय गणेशास ।
आवडे तो खास ।चतुर्थीला.।। ५ ।।
गौरीच्या तनया । दुःख निवारता ।
मांगल्य आणता । विघ्नेश्वरा...६
असे सकळांचा । संकट नाशक ।
देव विनायक । वक्रतुंड....७
देवांचा तो देव । बुध्दीचा नायक ।
भक्तांचा पालक । विद्याधर.. ।। ८।।
नाम तव घेता । मन होई मग्न ।
दूर होई विघ्न । विघ्नहर्ता.. ।। ९ ।।
सदा भक्तांवर । आशिर्वाद देवा ।
कृपा दृष्टी ठेवा । मोरेश्वरा... ।।१० ।।