गंध तुझा
गंध तुझा
1 min
380
गंध तुझा नक्षत्रांच्या
चांदण्यात भरला
आठवणीच्या नभांगणी
चंद्र होऊनी वरला
गंध तुझा रातराणीच्या
सुगंधासवे मुरला
वाऱ्याच्या झुळूकेसह
माझ्या श्वासात पुरला
गंध तुझा पारिजातकाच्या
नाजूक फुलात शिरला
एक-एक फूलं वेचितांना
फुला-फुलातं विरला
गंध तुझा आसमंती
कणाकणात जीरला
उधळूनी रंग सारे
कुंचला हा फिरला
गंध तुझा श्रावणाच्या
सरीतूनी बरसला
तुजसवे सहवासाला
एकेक क्षणही तरसला....